कोल्हापूर • प्रतिनिधी
पुणे येथे २७ व २८ सप्टेंबरला सब ज्युनियर राज्यस्तरीय जलतरण टाईम ट्रायल स्पर्धा झाली. या स्पर्धेत सुरभी तुषार देसाई हिने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात उत्तम कामगिरी केली. बेंगळुरू येथे १९ ते २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी ११ वर्षांखालील वयोगटांमध्ये तिची निवड झाली आहे.
सुरभी देसाईला सर पिराजीराव घाटगे ट्रस्ट (भवानी जलतरण तलाव) येथे स्विमिंग कोच पुजा नायर यांचे प्रशिक्षण आहे. ती वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून मुख्याध्यापिका वॉलेट बारदेस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.