शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरीता डास-अळी सर्व्हेक्षण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापालिकेच्यावतीने आज आरोग्य किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण २०१६ घरे तपासण्यात आली. या घरामध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे ३८५४ कंटेनर तपासले. यामध्ये दुषित ३६ ठिकाणी डास-अळी आढळल्या. दुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकणेत आले आहे.
     महापालिकेच्यावतीने खाजगी एजन्सीमार्फत २५ बिडिंग चेकर्स् नेमण्यात आले आहेत. आरोग्य निरिक्षक,  मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांच्यासोबत या बिडींग चेकर्सनी अक्षय पार्क, गंधर्व अपार्टमेंट, नागाळा पार्क, तानुबाई नगर, ऐश्वर्या पार्क, रॉयल अपार्टमेंट, विवेकानंद कॉलेज, कनाननगर झोपडपट्टी, लक्षदिप नगर, शाहूपुरी व्हिनस स्टेशनरोड, केळवकर हॉस्पीटल परिसर, कल्पना रेसिडन्सी, ट्रेड सेंटर, संचार कॉलनी, मिसाळ गल्ली, घोरपडे गल्ली, चव्हाण चाळ, ए.पी.हायस्कूल मागील परिसर, रमाई गल्ली इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
     तरी डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे आढळल्यास को.म.न.पा. आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी त्वरीत संपर्क साधावा. सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविणेत यावी. आठवडयामध्ये साठणाऱ्या पाण्याचे पिंप/भांडी एकाच ठिकाणी भरुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रेमधील पाणी आठ दिवसातून एकदा रिकामे करण्यात यावे. घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर्स, नारळाच्या करवंटया, डबे इत्यादीमध्ये पाणी साठू न देणे. घरामध्ये लांब बाहयांचे व संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे. डास प्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!