१२ आमदारांचे निलंबन : भाजपाच्यावतीने आघाडी सरकार विरोधात निदर्शने


कोल्हापूर • प्रतिनिधी
    महाराष्ट्रात तीघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केलीच आहे. यामध्ये भर म्हणून काल विधानसभा अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय करून मार्ग कसा निघेल हे बघायचे सोडून सूडबुद्धीचे राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केले. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूर च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
    भाजपा शहर व जिल्ह्याच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, भगवान काटे यांनी आमदारांच्या निलंबनाबद्दल आपल्या मनोगतामध्ये तीव्र निषेध नोंदवला तसेच महाभकास आघाडी सरकारच्या अपयशांचा पाठा वाचला.
      यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी  दिलीप मेत्राणी, विठ्ठल पाटील, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, जिल्हा ग्रामीणचे हंबीरराव पाटील, महेश मोरे, शरद महाजन, सचिन पाटील, दीपक शिरगांवकर, गजेन्द्र हेगडे, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विवेक कुलकर्णी, भरत काळे, आशिष कपडेकर, संदीप कुंभार, महेश यादव, राजाराम परीट, प्रकाश कालेकर, विद्या बनछोडे, विद्या बागडी, सचिन गंडमाळे, कृष्णात भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *