कपिलतीर्थ मार्केटमध्ये फळे, भाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या स्वॅबची तपासणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते यांना आरटीपीसीआर व लसीकरण पूर्ण करुन घेणेबाबतच्या सूचना प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्याप्रमाणे सोमवारी (दि.१२) कपिलतीर्थ मार्केट येथे ४५ वर्षाच्या आतील १३० फळे, भाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली.
      त्याचबरोबर इतर मार्केटमधील फेरीवाल्यांना महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचबरोबर ४५ वर्षावरील विक्रेत्यांना लसीकरण करुन घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
       यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, अतिक्रमण पथकप्रमुख पंडीत पोवार, आरोग्य निरीक्षक गीता लखन व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!