पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य भाजपाच्यावतीने स्वच्छता अभियान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने रंकाळा टॅावर परिसर (राजघाट) येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत “सेवा व समर्पण अभियान”च्या  माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, अनाथाश्रम-वृद्धाश्रम याठिकाणी मदत, गरजू कुटुंबांना रेशन किट वितरण, रक्तदान शिबीर यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत भाजपा कोल्हापूरच्यावतीने शहरातील सात मंडलांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
      यामध्ये शुक्रवारी शिवाजी पेठ मंडलाच्यावतीने रंकाळा टॅावर परिसर (राजघाट) येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या परिसरात स्वच्छता करून कचरा, प्लास्टिक बॉटल एकत्रित केल्या. उपस्थित सर्वांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला.   
     याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, संजय सावंत, राजू मोरे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत, गिरीष साळोखे, अशोक लोहार, सचिन मुधाले, गौरव सातपुते, सचिन सुतार, प्राची कुलकर्णी, हर्शांक हरळीकर, कविता पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!