सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्या: जिल्हाधिकारी दौलत देसाई

Spread the love


 कोल्हापूर  (जिल्हा माहिती कार्यालय)
      जिल्ह्यातील यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनांमधील मंजूर सर्व निधी खर्च होईल याची दक्षता घ्या. प्रशासकीय मान्यतेसाठी २० तारखेपर्यंत प्रस्ताव दाखल करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची जिल्हा वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आणि सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी विभागवार मंजूर नियतव्यय, समर्पित निधी याबाबत सादरीकरण केले.
       जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सर्व विभाग प्रमुखांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, आयपास प्रणालीव्दारे २० जानेवारीपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल करावेत. सर्व विभाग प्रमुखांनी त्यांना मंजूर झालेला नियतव्यय वेळेत खर्च करावा. शक्यतो निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घ्यावी. याव्यतिरिक्त मोठ्या योजनेसाठी राज्य शासनाकडे काही निधी मागायचा असेल तर त्याचे सविस्तर प्रस्तावही २३ तारखेपर्यंत द्यावेत.
        बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, डीआरडीएचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय. ए. पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ आदीसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!