अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्यावतीने ना. विश्वजीत कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन

 कोल्हापूर • प्रतिनिधी      अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्यावतीने सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाचे अध्यक्ष  रघुनाथ मोरे,भगवान नरोटे, दामाजी रोटे, एम. के. चव्हाण, जीवन पोवार, उपाध्यक्ष दिपक खांडेकर, अजित अंकारे, वसंत पोवार, दत्तात्रय बामणीर  उपस्थित होते.       अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्यावतीने ना.विश्वजीत कदम यांना मुंबई येथे निवेदन देऊन विविध मागण्यांविषयी चर्चा केली. ना. कदम यांना दिलेल्या निवेदनात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडील सर्व योजना कर्ज पुरवठा संदर्भात मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महामंडळाकडील सर्व योजना पूर्ववत चालू करणे, कर्ज योजना ५ ते १५ लाख रुपये करणे, महामंडळाकडील बीज भांडवल कर्ज योजना महामंडळाचा भाग ४५ टक्के करून त्यामध्ये ३०,०००/- रूपये अनुदान मिळावे, कर्जास नोकरवर्ग जामिन रद्द करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *