तेजस्विनी खराडे हिची राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड

Spread the love

• सानिका झांजगे व पूनम पाटील राखीव खेळाडू निवड
कोल्हापूर • प्रतिनिधी
      हॉकी इंडियाच्यावतीने ३ ते १२ एप्रिलअखेर सिमडेगा (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी कु. तेजस्विनी पुंडलिक खराडे  (शाम स्पोर्ट्स )हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. राखीव खेळाडू म्हणून सानिका झांजगे व पूनम पाटील यांची निवड झाली आहे.
    यासाठीचा स्पर्धापुर्व कॅम्प बालेवाडी (पुणे) येथे सुरू आहे. यापूर्वी तेजस्विनीची सलग दोनवेळा राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती. ती भोगावती महाविद्यालय (कुरुकुली)ची हॉकी खेळाडू व भाई सी. बी.पाटील विद्यालय (हसूर दुमाला )ची माजी विद्यार्थिनी आहे. या खेळाडूंना  हॉकी महाराष्ट्राचे सेक्रेटरी मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पाटील, उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी,  ट्रेझरर सागर जाधव व इतर सर्व सदस्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच शाम स्पोर्टसचे हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले यांचे मार्गदर्शन लाभले

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!