टेंबे रोड व आझाद चौक ते रावणेश्वर मंदीरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

• क्रॉसडेन कामासाठी रस्ता १४ दिवस बंद
कोल्हापूर • प्रतिनिधी
      प्रभाग क्रमांक ३४ शिवाजी उद्यमनगर अंतर्गत दिलबहार तालीम रिक्षा स्टॉप येथील चौकात क्रॉसड्रेन काम करण्यात येत आहे. सदरचे काम करण्यासाठी सावित्रीबाई फुले चौक ते देवल क्लब चौक (टेंबे रोड) व आझाद चौक ते रावणेश्वर मंदीरपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी १४ दिवस बंद ठेवावा लागणार आहे. हे क्रॉसडेनचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 
      सदरचे काम पूर्ण होईपर्यतच्या कालावधीत आझाद चौक ते बिंदू चौक, माधुरी बेकरी ते देवल क्लब चौक या मार्गावरील एकेरी वाहतूक रद्द करुन दुहेरी वाहतूक चालू करण्यात येणार आहे. तरी संबंधीत सर्व नागरीकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *