युवावर्गाचा कल भाजपाकडे: चंद्रकांतदादा पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवामोर्चाच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे विविध क्षेत्रातील स्थान शिखरावर नेले आहे. तसेच देशात विविध नव-नवीन योजनांच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार, उद्योगासाठी भांडवल व इतर सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युवावर्गाचे आकर्षण भाजपाच्या दिशने वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाला वैयक्तिक ७८००० पेक्षा जास्त मते मिळवण्यात यश आले आहे. यातून एक गोष्ट समोर येते की, लोकांचा कल भाजपाकडे वळत आहे. विशेष करून सध्याचा युवावर्ग जागरूक आहे. सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवरती त्यांचं बारीक लक्ष असते. त्यामुळे त्यांनादेखील राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाजपाचे काम पटत आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.  भाजपाचे सध्याचे अनेक दिग्गज नेते हे भाजपा युवा मोर्चामधूनच मोठ्या स्तरावर पोहोचले आहेत, याचाच आदर्श समोर ठेऊन नूतन पदाधिकारी काम करतील असा विश्वास मला आहे.
      याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विजयसिंह खाडे – पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून अनेक विविध आंदोलनाद्वारे व इतर कार्यक्रमांद्वारे शहरात युवा मोर्चा सक्रिय आहे. आरोग्य सेवक भरती घोटाळा, विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक, एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्ती न मिळाल्याविरोधात शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने. युवकांच्या विविध प्रश्नांच्या पाठपुरावयासाठी युवा मोर्चा सदैव त्यांच्या सोबत होता व असेल. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत युवा मोर्चामधील चेहरे सभागृहात दिसतील असा विश्वासदेखील देतो.
      भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उल्लेखनीय काम करत आला आहे, मग ते आंदोलने असो, सत्कार समारंभ असो किवा इतर सामाजिक कार्यक्रम. सध्या कोल्हापूरातील युवा वर्ग भाजपाकडे आकर्षित होताना दिसत आहे. भाजपाच्या भविष्याच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. वरिष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नवीन प्रवेश केलेले पदाधिकारीदेखील आपली जबाबदारी पार पडतील यात काहीच शंका नाही.
      कार्यक्रमास प्रभारी आकाश कांबळे, विराज चिखलीकर, दिलीप मैत्राणी, विवेक वोरा, गिरीश साळुंखे, सुनील पाटील, रोहित कारंडे, गौरव सातपुते, हर्षांक हरळीकर, प्रणव पवार, प्रसाद पाटोळे, सिद्धांत भेंदवडे आदी उपस्थित होते.
           युवा मोर्चाचे नवीन पदाधिकारी…..
   पारस महेश पलीचा (सरचिटणीस), विजय सुभाष दरवान (उपाध्यक्ष), विशाल राजेंद्र शिरळकर (उपाध्यक्ष), ओंकार अविनाश गोसावी (वॉर्ड अध्यक्ष), प्रयास दत्तात्रय भोसले (विद्यार्थी संयोजक – शिवाजी विद्यापीठ), प्रसाद बाबुराव पाटोळे (आत्मनिर्भर भारत संयोजक), हर्षांक जयंत हरळीकर (शाहूपुरी मंडल अध्यक्ष), प्रणव किरण पवार (युवा वॉरीयर्स संयोजक), नितीश कुलकर्णी (सोशल मीडिया संयोजक)
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!