थायलंडच्या कॉन्सुलेट जनरलनाही भावले “अस्पेरिया”

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     सुसज्ज व अद्ययावत आणि माफक दरात उपचार देणारे अस्पेरिया हे कॉस्मेटिक क्लिनिक आणि हेअर ट्रान्सप्लांट सेंटर थायलंडच्या कॉन्सुलेट जनरल मेट्टाप्रर्से यांना चांगलेच भावले. मेट्टाप्रर्से यांच्या हस्ते बुधवारी मुंबईतील पवई येथे या कॉस्मेटिक क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
      यावेळी बोलताना मेट्टाप्रर्से म्हणाल्या की, या क्षेत्रातील आधुनिक विज्ञान आणि कौशल्याचा वापर करून उपचार करणारे हे सुसज्ज आणि अद्ययावत क्लिनिक आणि ट्रान्सप्लांट सेंटर आहे. पवईसह मुंबई आणि महाराष्ट्रातील  ग्राहकांसाठी हे अतिशय वाजवी दरात उपलब्ध असणारे क्लिनिक  ठरणार आहे. या क्लिनिकचा भविष्यात आपणही नक्कीच उपभोग घेऊ.
      सध्या जागतिक हवामान बदलामुळे माणसाच्या शरीरावर परिणाम होत असून त्याचा सौंदर्यावर आणि केस गळतीवरही दुष्परिणाम होत आहे. यावर या क्लिनिकद्वारे नक्कीच योग्य उपचार केले जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
      गोकुळचे संचालक आणि युथ डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष चेतन नरके यांच्या प्रयत्नातून हे अस्पेरिया कॉस्मेटिक क्लिनिक उभे राहिले आहे. येथे डॉ.अझरम खान या सौंदर्यतज्ज्ञ कॉस्मेटिक सर्जन असणार आहेत.
       “अस्पेरिया” च्या उद्घाटन सोहळ्याला डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंडच्या डायरेक्टर सुपत्रा, प्रभात डेअरीचे अध्यक्ष निर्मल सारंग, माधव पाटगावकर, इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनचे अध्यक्ष अरुण पाटील, यशवंत संघ आणि कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संदीप नरके, मिराई ॲसेट कॅपिटल साउथ कोरियाचे सीईओ जिसँग यो, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल सुचिता कामकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!