केडीसीसी बँकचे अध्यक्ष व संचालक मानणार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद

Spread the love


          
• बँक देशात अग्रस्थानी आणल्याबद्दल उद्या कार्यशाळा
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या सहा वर्षात केडीसीसी बँक सबंध देशात अग्रस्थानी आणल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानणार आहेत. त्या अनुषंगाने बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा रविवारी (दि.३१) कोल्हापुरातील मार्केट यार्डमध्ये शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे.  या कार्यशाळेला अध्यक्ष व मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळातील सर्वच सदस्य उपस्थित राहणार आहेत.
      याबाबत अधिक माहिती अशी, सहा वर्षांपूर्वी मे २०१५ मध्ये विद्यमान संचालक मंडळ बँकेच्या सत्तेत आले. या सहा वर्षांमध्ये बँकेने सर्वच आर्थिक निकषामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये अधिकारी व कर्मचा-यांचे योगदान मोठे आहे.
      हे संचालक मंडळ सत्तेवर  येण्याआधीचा १०३ कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढून बँक सरासरी दीडशे कोटींच्या ढोबळ नफ्यामध्ये आणली आहे. वसूल भागभांडवल दीडशे कोटींवरून सव्वादोनशे कोटींवर आले आहे. ठेवींमध्येही अडीच पट वाढ होऊन ठेवी सात हजार कोटींच्या घरात पोहोचले आहेत. गुंतवणूक व कर्ज वितरणामध्येही दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
       कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे अशी कार्यशाळा घेता आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेला महत्व आहे. या कार्यशाळेमध्ये व्यवसाय वाढीबरोबरच ठेवी, व्यक्तिगत कर्जपुरवठा, कारखानदारीचा वित्तपुरवठा या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच दीपावली शुभेच्छाही दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!