कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा होणार साधेपणाने

Spread the love

• लवकरच पर्यटकांसाठी दर सोमवारी अन्नछत्र
कोल्हापूर • प्रतिनिधी
       मंगळवार पेठ, खासबाग, भोसले गल्ली येथील शिवालय कैलासगडची स्वारी मंदिराचा ६२ वा वर्धापनदिन सोहळा यंदा साधेपणाने साजरा होणार आहे. मंदिराचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांचे निधन व कोरोनासंदर्भाने दरवर्षी होणारा महाप्रसाद यंदा रद्द केला असल्याची माहिती अध्यक्ष बबेराव जाधव व उपाध्यक्ष सत्यजीत चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       दरम्यान, कैलासगडची स्वारी मंदिरास अनेक पर्यटक भेट देतात. या पर्यटकांसाठी लवकरच दर सोमवारी अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. सुमारे दोनशे लोकांसाठी हा प्रसादाचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सत्यजीत जाधव यांनी सांगितले.
       कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा दि. १६ ते १८ मार्च या कालावधीत साधेपणाने साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन, भजन, शुक्रवारी (दि.१८) पहाटे पाच वाजता शिवास रुद्राभिषेक व शिवालय भजनी मंडळ यांचे भजन व सकाळी ९:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती होणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता धनगरी ढोल व सायंकाळी ५:०० वाजता पालखी सोहळा होईल. त्याचे उद्घाटन मंदिराचे अध्यक्ष बबेराव जाधव यांच्या हस्ते व पालखी पूजन पद्मश्री माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील आणि उद्योजक व मंदिराचे उपाध्यक्ष सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सायंकाळी ६:३० वाजता बबेराव शंकरराव जाधव व माजी नगरसेविका श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव  यांच्या हस्ते प्रसाद वितरण होणार आहे. यावेळी मंदिराचे विश्वस्त, भक्त व भागातील नागरिकांचा सहभाग असतो. पालखी प्रदक्षिणावेळी झांजपथक , धनगरी ढोल व शिवालय भजनी मंडळाचे भजन व आतषबाजी असा सोहळा स्वारींच्या आशिर्वादाने साजरा होत असल्याचे मंदिराचे सेक्रेटरी अशोक मेस्त्री व सहाय्यक सेक्रेटरी विलास गौड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!