छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी अण्णा मोगणे सहारा क्रिकेट क्लबने जिंकली

Spread the love


• शाहूपुरी जिमखाना स्पोर्ट्स उपविजेता
कोल्हापूर • प्रतिनिधी
      जेतेपद मिळवण्यासाठी झालेल्या सामन्यात अण्णा मोगणे सहारा क्रिकेट क्लबने शाहूपुरी जिमखाना स्पोर्ट्सवर ६० धावांनी मात करून छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी जिंकली. शाहूपुरी जिमखाना स्पोर्ट्स उपविजेता ठरला. या सामन्यात
श्रेयस पाटील उत्कृष्ठ फलंदाज व मालिकावीर तर श्रीराज चव्हाण उत्कृष्ठ गोलंदाज ठरला.
       छत्रपती राजाराम महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌ असोसिएशन (केएसए) आयोजीत छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी खुल्या गटातील ट्‌वेंटी-ट्‌वेंटी क्रिकेट स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण १४ संघानी सहभाग घेतला होता.
     कोल्हापुरातील नामांकित अशी ही स्पर्धा १९५० मध्ये केएसएने सुरू केलेली असून उत्कृष्ट अशा नॅचरल क्रिकेट टर्फवर घेण्यात येते. या स्पर्धेमध्ये मुंबई व पुणे येथील अनेक नामांकित कसोटी व रणजी क्रिकेटपटू खेळलेले आहेत. याचबरोबर कोल्हापुरातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत दर्जेदार खेळाची कामगिरी करत क्रिकेट क्षेत्रात यशस्वी भरारी घेतलेली आहे व घेत आहेत.
      स्पर्धेतील अंतिम सामना अण्णा मोगणे सहारा क्रिकेट क्लब व शाहुपूरी जिमखाना स्पोर्ट्‌‌‌स्‌ यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना अण्णा मोगणे सहारा क्रिकेट क्लबने २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. त्यामध्ये रणजी खेळाडू रणजित निकमने ४०, भरत पुरोहितने नाबाद ४३, विशाल कल्याणकरने ३५, सुरज कोंदळकरने २९ व ओंकार यादवने नाबाद २१ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये शाहुपूरी जिमखाना स्पोर्ट्सच्या अजय चुयेकरने २ तर जयवीर नंदाल, श्रेयस पाटीलन व आकाश पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अवांतर धावा ४ दिल्या.
      उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी जिमखाना संघाच्या १७.२ षटकांत सर्वबाद १२६ धावा झाल्या. त्यामध्ये श्रेयस पाटीलने ४०, सुदीप पाठकने २३, जयवीर नंदालने १५, विवेक पाटीलने १० धावा व ओंकार इंगळेने १० धावा केल्या. गोलंदाजी करताना ओंकार यादवने १३ धावात बळी घेतले. तसेच संदीप पाटीलने २ तर भरत पुरोहित, श्रीराज चव्हाण व रणजीत निकमने प्रत्येकी एक बळी घेतले. अवांतर धावा २ दिल्या.
                                 बक्षीस समारंभ…..
     स्पर्धेचा बक्षीस समारंभ यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते झाला. विजेता अण्णा मोगणे सहारा क्रिकेट क्लबला यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते फिरती ट्रॉफी व कायमस्वरूपी चषक तसेच रोख ७००० रूपये त्याचप्रमाणे उपविजेत्या शाहूपुरी जिमखाना स्पोर्ट्स संघास कायमस्वरूपी चषक व रोख ५००० रूपये प्रदान करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज व मालिकावीर म्हणून शाहुपूरी जिमखान्याचा खेळाडू श्रेयस पाटील तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून अण्णा मोगणे सहाराचा श्रीराज चव्हाण यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
      यावेळी केएसएचे जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र दळवी, ऑन. फायनान्स सेक्रेटरी व क्रिकेट सेक्रेटरी नंदकुमार बामणे तसेच कार्यकारिणी सदस्य दिग्विजय राजेभोसले व दिपक घोडके उपस्थित होते.
                           विजेता संघ असा…..
      विशाल कल्याणकर, सुरज कोंदळकर, रोहित पाटील, रणजीत निकम, अतिश वरपे,  भरत पुरोहित, ओंकार यादव, स्मित पाटील, श्रीराज चव्हाण, प्रसन्न पाटील, संदीप पाटील
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!