मावळत्या सोनसळी सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईचे मुखकमल उजळले

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    किरणोत्सवातील दुसऱ्याच दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला. खरंतर, किरणोत्सवाच्या मुख्य दिवसांपूर्वी (दि.३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी) सोहळा झाला. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सव सोहळ्यास शनिवारी प्रारंभ झाला. आज, रविवारी मावळतीला निघालेली सोनसळी सूर्यकिरणे श्री अंबाबाईच्या मुखावर येऊन स्थिरावली. किरणे देवीच्या मुखावर स्थिरावली अन् मुखकमल उजळून निघाले. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी किरणोत्सव पूर्ण झाला.
     श्री अंबाबाई मंदिरात वर्षांतून दोनवेळा किरणोत्सव सोहळा होतो. सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायणामुळे हा किरणोत्सव होतो. श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची मूर्ती पश्र्चिमाभिमुख आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारही पश्चिमेला असल्याने मावळतीला निघालेली सोनसळी सूर्यकिरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचतात आणि किरणोत्सव सोहळा पूर्ण होतो.
      यापूर्वी किरणोत्सव सोहळा तीन दिवस असायचा परंतु गेल्या दोन वर्षांपासून तो पाच दिवसांचा करण्यात आला आहे. या वर्षातील किरणोत्सवास शनिवारी (दि.२९) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी मावळतीला निघालेली सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. त्यानंतर आज, रविवारी (दि.३०) मावळतीला निघालेली सूर्यकिरणे महाद्वारातून गरूड मंडप, गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा ओलांडून गाभाऱ्यात पोहोचली. सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून कमरेपर्यंत आली. त्यानंतर ती मुखावर येऊन स्थिरावली. किरणे देवीच्या मुखावर स्थिरावली अन् मुखकमल उजळून निघाले. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी किरणोत्सव सोहळा पूर्ण झाला. यानंतर घंटानाद होऊन देवीची आरती झाली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!