गोकुळकडून दूध उत्पादकांना भरघोस दर फरक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर गोकुळने सन २०२०-२०२१ या वर्षामधील प्राथमिक दूध संस्थानी संघास पुरविलेल्या म्हैस व गाय दुधास अनुक्रमे रू २.०५पैसे व रू १.०५पैसे याप्रमाणे दूध दर फरक व दूध संस्थाना प्रती लिटर ०.५५ पैसे रक्कम डिबेंचर्स दिले आहे.
      डिबेंचर्सची रक्कम संबधित दूध संस्थेच्या नावावर संघात जमा असून त्या रक्कमेवर संघाकडून प्रत्येक वर्षास व्याज देण्यात येते. वार्षिक सर्वसधारण सभेने दिलेल्या मंजुरीनुसार सदर डिबेंचर्स रक्कम १० वर्षानंतर संबधित दूध संस्थेच्या शेअर भांडवलामध्ये वर्ग करण्यात येते. शेअर भांडवलावर आकर्षक असा डिव्हीडंड देण्यात येतो. यामुळे संघाचे भागभांडवल वाढल्याने संघास आर्थिक बळकटी मिळाली आहे. तसेच दूध संस्थाही आर्थिकदॄष्ट्या सक्षम झाल्या आहेत. काही दूध संस्था आलेला डिव्हीडंड दूध उत्पादकांना दरफरक रक्कमेमध्ये अधिक रक्कम करून देतात किंवा दूध उत्पादकांना डिव्हिडंड रूपानेही देतात अशी पध्दत गेली अनेक वर्षे संघामार्फत सुरू आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक व दूध संस्थांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे. दरफरक आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्चवर जाहीर करून तो दिवाळीस व्याजासह देण्यात येतो अशी पध्दत महाराष्ट्रात केवळ गोकुळ दूध संघामध्येच आहे.
      वार्षिक दूध दरफरक हा आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्चमध्ये देण्यात येतो. संघाचा वर्षाचा काटकसरीचा कारभार व मिळालेले उत्पन्न यामधुन खर्च वजा जाता शिल्लक राहणाऱ्या वाढाव्यावर दरफरक निश्चित केला जातो. वर्षा अखेरीस दरफरक जाहीर केला जातो २०१६-२०१७ मध्ये ०.५५ पैसे डिबेंचर्स घेतले आहेत. दूध दरफरक रक्कमेतून डिबेंचर्स कपात करून घेणे अशी कामकाजाची पध्दत सन १९९२-१९९३ पासून सुरू आहे त्यामुळे संस्थाना विश्वासात न घेता दूध दर फरक रक्कमेतुन परस्पर रक्कम कपात केली आहे या म्हणन्यात काही ही तथ्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!