• उर्वरित रक्कम १८/२४ महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये कोल्हापूर • प्रतिनिधी जिओ आणि गुगलने शुक्रवारी घोषणा केली की, दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे डिझाइन केलेले बहुप्रतिक्षित जिओफोन नेक्स्ट दिवाळीपासून स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. हा जगातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल, जो ₹ १९९९च्या डाउन पेमेंटसह खरेदी केला जाऊ शकतो, बाकीचे पैसे १८/२४ महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये दिले जाऊ शकतात. जिओफोन नेक्स्ट कंपनीने खास डिझाइन केलेल्या प्लॅनसह बंडल केले आहे. यामध्ये प्लॅन्ससोबत ग्राहक जिओफोन नेक्स्टचे हप्ते देखील भरू शकतात. पहिला प्लान ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकाला १८ महिन्यांसाठी ३५० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ३०० रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकाला दर महिन्याला 5 GB डेटा आणि १०० मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल. दुसरी योजना मोठी योजना आहे, ज्यामध्ये १८ महिन्यांचा हप्ता घेण्यासाठी प्रति महिना ५०० रुपये आणि २४ महिन्यांचा हप्ता घेण्यासाठी ४५० रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळेल. तिसरा प्लॅन XL प्लॅन आहे, हा 2 GB प्रतिदिन प्लॅन आहे ज्यामध्ये १८ महिन्यांच्या हप्त्यासाठी रुपये ५५० आणि २४ महिन्यांच्या हप्त्यासाठी रुपये ५०० प्रति महिना आहे. XXL योजना त्यांच्यासाठी आहे जे भरपूर डेटा वापरतात. या प्लानमध्ये 2.5 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये १८ महिन्यांसाठी ६०० रुपये आणि २४ महिन्यांसाठी ५५० रुपये हप्ता भरावा लागेल. याप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “गुगल आणि जिओच्या टीम्स सणासुदीच्या काळात भारतीयांसाठी हे उपकरण वेळेवर आणण्यात यशस्वी झाले आहेत. कोविड महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळीतील आव्हाने असूनही आम्ही यशस्वी झालो आहोत. १.३५ अब्ज भारतीयांचे जीवन समृद्ध, सक्षम आणि सशक्त करण्याच्या डिजिटल क्रांतीच्या सामर्थ्यावर माझा ठाम विश्वास आहे. जिओफोन नेक्स्टच्या अनेक समृद्ध वैशिष्ट्यांपैकी, ज्याने मला सर्वात जास्त प्रभावित केले – आणि जे सामान्य भारतीयांना सर्वात जास्त सक्षम करेल. आपली भाषिक विविधता ही भारताची खास ताकद आहे. ज्या भारतीयांना इंग्रजी किंवा त्यांच्या स्वत:च्या भाषेतील मजकूर वाचता येत नाही ते या स्मार्ट उपकरणावर त्यांच्या स्वत:च्या भाषेत भाषांतर करू शकतात आणि वाचू शकतात. गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, “जिओफोन नेक्स्ट हा भारतासाठी परवडणारा स्मार्टफोन आहे, तसेच या विश्वासाने प्रेरित आहे की भारतातील प्रत्येकाने इंटरनेटच्या संधींचा लाभ घ्यावा. हे तयार करण्यासाठी, आमच्या टीमने जटिल अभियांत्रिकी आणि डिझाइन आव्हाने सोडवण्यासाठी एकत्र काम करावे लागले आणि लाखो लोक त्यांचे जीवन आणि समुदाय सुधारण्यासाठी या साधनांचा वापर कसा करतील हे पाहण्यासाठी मला खूप आनंद होतो. जिओफोन नेक्स्टची काही वैशिष्ट्ये….. • ड्युअल सिम: जिओफोन नेक्स्टमध्ये दोन सिम स्लॉट देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्ही जिओ व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीचे सिम कोणत्याही एका स्लॉटमध्ये वापरू शकता, परंतु जिओ सिम एका सिम स्लॉटमध्ये टाकावे लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटाचे कनेक्शन फक्त जिओ सिमशी जोडले जाईल. म्हणजे दुसर्या कंपनीचे सिम फक्त बोलण्यासाठी वापरता येईल, मात्र डेटासाठी फक्त जिओ नेटवर्क वापरावे लागेल. • एसडी कार्ड स्लॉट: नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट व्यतिरिक्त, एक SD कार्ड स्लॉट स्वतंत्रपणे देण्यात आला आहे. जे 512 GB पर्यंत SD कार्डला सपोर्ट करते. • स्क्रीन: कॉर्नर गोरिल्ला ग्लास-3 सह 5.45-इंच एचडी टचस्क्रीन • वैशिष्ट्ये:- 2GB रॅम, 32GB अंतर्गत मेमरी, 512GB पर्यंत सपोर्ट करणारा SD कार्ड स्लॉट, मल्टीटास्किंगसाठी 64bit CPU सह क्वाड कोअर QM215 चिपसेट • कॅमेरा: 13MP रिअर आणि 8MP सेल्फी कॅमेरा, नाईट मोड, पोर्ट्रेट मोड आणि HDR मोड, दिवाळी फिल्टरसारख्या भारतीयांसाठी खास लेन्स फिल्टरसह सुसज्ज. • बॅटरी: 3500mAh बॅटरी, एका चार्जवर ३६ तास टिकेल असा कंपनीचा दावा आहे. ——————————————————- ReplyForward