प्रॅक्टीस क्लबला सूर गवसला!

Spread the love

• खंडोबा (ब) – झुंजार क्लब सामना बरोबरीत
कोल्हापूर • प्रतिनिधी
       केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या लढतीत बलाढ्य प्रॅक्टीस क्लबला बीजीएम स्पोर्टसकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीत ‘प्रॅक्टीस’ने खंडोबा तालीम मंडळ (अ) वर ३-०ने एकतर्फी विजय मिळवला. पहिल्या फेरीतील पराभवानंतर प्रॅक्टीस क्लबला सूर गवसला आहे. त्याच्या नेमके उलट खंडोबा (अ) चे झाले आहे. पहिल्या फेरीत ‘फुलेवाडी’ संघावर विजय संपादन केलेल्या खंडोबा (अ) संघास पराभव पत्करावा लागला.
       दरम्यान, खंडोबा (ब) आणि झुंजार क्लब यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेतील दुसऱ्या फेरीस शनिवारी प्रारंभ झाला. प्रॅक्टीस-खंडोबा (अ) लढतीस चुरशीने सुरुवात झाली. प्रॅक्टीसकडून झालेल्या चढाईत सागर चिलेने १६ व्या मिनिटास गोल करून आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबा (अ) च्या खेळाडूंनी रचलेल्या चाली वाया गेल्या. त्यानंतर उत्तरार्धात आघाडी वाढवण्यासाठी प्रॅक्टीस क्लबच्या सागर चिले, राहुल पाटील, ओमकार मोरे, कैलास पाटील यांनी खोलवर चढाया केल्या. त्यामध्ये ५३ व्या मिनिटास आकाश माळीने गोल नोंदवून संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर ओमकार मोरेने मिळालेल्या संधीचा लाभ उठवला आणि ६८व्या मिनिटास गोल केला. खंडोबाकडून अजिज मोमीन, प्रभू पोवार, श्रीधर परब यांनी गोलची परतफेड करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना अखेरपर्यंत यश मिळाले नाही. प्रॅक्टीसने ३-०ची आघाडी राखत विजयावर शिक्कामोर्तब करून ३ गुणांची कमाई केली. 
       तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात खंडोबा (ब) आणि झुंजार क्लब यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्हीही संघाकडून कोणत्याही खेळाडूला गोल नोंदवता आला नाही, परिणामी सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला. 
                     दुसऱ्या फेरीतील सामने…..  • दि.२७- जुना बुधवार – सम्राटनगर स्पोर्टस
              फुलेवाडी – बीजीएम स्पोर्टस
• दि.२८- पोलिस संघ – उत्तरेश्वर
              पीटीएम (अ) – बालगोपाल
• १ मार्च- पीटीएम (ब) – ऋणमुक्तेश्वर
              शिवाजी – दिलबहार   

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!