रिलायन्स जिओमुळे गगनबावड्यातील दुर्गम कोदे गाव मुख्य प्रवाहात

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका आणि या तालुक्यातील अतिदुर्गम पण निसर्गसौंदर्याने नटलेला, तसेच शून्य टक्के (झिरो) प्रदूषण असलेला भाग म्हणजे कोदे गाव.
     या भागात गेली अनेक वर्षे कोणत्याही कंपनीची मोबाईल सेवा पुरेशी नसल्यामुळे  तसा जगाशी संपर्क तुटलेलाच असायचा. गेली दोन वर्ष कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू यानुसार गावातील मुले आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिथे रेंज आहे अशा ठिकाणी जाऊन आपला ऑनलाइन अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी डोंगरावर छोटी झोपडी बांधून अभ्यासाची सोय या विद्यार्थ्यांनी केली होती. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शिक्षण देत होते.
     गेली काही वर्षे या भागात उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा टॉवर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळे बंद होता. जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक नेतेमंडळी तसेच नागरिकही हा टॉवर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसत होते.
अनेक पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, तसेच तांत्रिक अडचणी पार करत शेवटी गोकुळ अष्टमीच्या मुहूर्तावर जिओ टीमच्या अथक परिश्रमाने हा टॉवर सुरू झाला. त्यामुळे सर्वात जास्त आनंद हा विदयार्थी वर्गात झाला आहे. आता त्यांना घरबसल्या स्वतःच्या घरातून शैक्षणिक कामकाज पूर्ण करता येईल. जिओ टीमच्या अथक परिश्रमाला विद्यार्थी आणि शिक्षकांनी मनापासून धन्यवाद दिले आहेत.
     विद्यार्थी वर्गाकडून जिओला मनापासून धन्यवाद दिले असून विद्यार्थी तसेच इतर ग्रामस्थ आणि कर्मचारी खूप खूष आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन हा विद्यार्थीवर्ग एक दिवस नक्कीच आपली शैक्षणिक उंची गाठेल अशी भावना यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कृष्णा भोसले यांनी व्यक्त केली.
     भारतात खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती आणणाऱ्या रिलायन्स जिओने अशी अनेक दुर्गम खेडी जोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अशाच खांडके गावात तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जिओमुळे मोबाईलची रिंग वाजली.
——————————————————- ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!