‘लिग चॅम्पियन’ ठरविणाऱ्या केएसए चषक स्पर्धेचा थरार!

Spread the love

• “किक ऑफ”ची उत्सुकता शिगेला
कोल्हापूर • सुरेश आंबुसकर 
     केएसए चषक स्पर्धेने दरवर्षी फुटबॉल हंगामाला प्रारंभ होतो. साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळविणारा संघ “लिग चॅम्पियन”चा बहुमान पटकावतो. या “लिग चॅम्पियन” ठरविणाऱ्या स्पर्धेला २२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असल्याने खऱ्या अर्थाने सन २०२१-२२च्या फुटबॉल हंगामाचा “किक ऑफ” होईल.
     दरम्यान, मंगळवारी (दि.२२) दुपारी दोन वाजता खंडोबा तालीम मंडळ (ब) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस तर दुपारी चार वाजता प्रॅक्टीस फुटबॉल क्लब विरुद्ध बीजीएम स्पोर्टस असे सामने होतील. छत्रपती शाहू स्टेडियमवर होणारे सामने विनाप्रेक्षक होतील.
      गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या कालावधीत दरवर्षी (कोरोना कालावधी वगळता) कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) तर्फे फुटबॉल हंगामासाठी संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रिया होते अन् दिवाळीनंतर मात्र कोल्हापूरातील फुटबॉल संघ, खेळाडू व फुटबॉलशौकिनांना वेध लागतात ते ‘केएसए लिग’चे! केएसए लिग-केएसए चषक अर्थात केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा सर्व संघांसाठी महत्वाची असते. वरिष्ठ गटातील सोळा संघांचे मानांकन यातून ठरते आणि पुढे होणाऱ्या नॉकआऊट स्पर्धांसाठी संघव्यवस्थापनाकडून आपापल्या संघांची व्यूहरचना आखली जाते.
      गतवर्षी झालेल्या एकूण स्पर्धांमधील कामगिरीनुसार सोळा संघांची सिनियर सुपर-८ आणि सिनियर-८ अशा दोन गटात विभागणी होऊन त्यांच्यामध्ये ७ फेऱ्यांमध्ये एकूण ५६ सामने होतात. ७ फेऱ्यांमधील लढतीतूनच खेळाडूंची व संघाचीही कामगिरी सिध्द होते. सिनियर सुपर-८ गटात सर्वाधिक गुण मिळवणारे दोन संघ विजेता व उपविजेता ठरतात. तसेच सिनियर-८ गटातील सर्वात कमी गुण मिळालेले दोन संघ केएसए कनिष्ठ ब गटात जातात. सिनियर सुपर-८ गटात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत “लिग चॅम्पियन”चा बहुमान पटकावण्यासाठी चढाओढ असते. तसेच सिनियर-८ गटात वरिष्ठ गटातील आपले स्थान अबाधित राखण्यासाठी व कनिष्ठ गटात होणारी गच्छंती टाळण्यासाठी संघांची धडपड सुरू असते. यामुळेच लिग स्पर्धेतील सामन्यांविषयी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.
       कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने केएसए चषक स्पर्धेत होणारे एकूण ५६ सामने जाहीर केले आहेत. दररोज दोन याप्रमाणे छत्रपती शाहू स्टेडियमवर सामने खेळले जातील. पहिला सामना दुपारी दोन वाजता तर दुसरा सामना दुपारी चार वाजता सुरू होईल. पहिल्या दोन फेरीतील सामने पुढीलप्रमाणे:
• दि.२२- खंडोबा (ब) – सम्राटनगर स्पोर्टस
              प्रॅक्टीस – बीजीएम स्पोर्टस
• दि.२३- जुना बुधवार – झुंजार क्लब
              फुलेवाडी – खंडोबा (अ)          
• दि.२४- पोलिस संघ – ऋणमुक्तेश्वर
              पीटीएम (अ) – दिलबहार
• दि.२५- पीटीएम (ब) – उत्तरेश्वर
              शिवाजी – बालगोपाल
• दि.२६- खंडोबा (ब) – झुंजार क्लब
              प्रॅक्टीस – खंडोबा (अ)
• दि.२७- जुना बुधवार – सम्राटनगर स्पोर्टस
              फुलेवाडी – बीजीएम स्पोर्टस
• दि.२८- पोलिस संघ – उत्तरेश्वर
              पीटीएम (अ) – बालगोपाल
• १ मार्च- पीटीएम (ब) – ऋणमुक्तेश्वर
               शिवाजी – दिलबहार  
——————————————————-
 Attachments area

ReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!