डी.सी.नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर शुक्रवारपासून ग्रामीण फुटबॉलचा थरार!

Spread the love

• सांगरूळ फुटबॉल क्लब आयोजित डी.सी. नरके चषक स्पर्धा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      सांगरूळ फुटबॉल क्लबच्यावतीने डी. सी. नरके राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती संयोजक संभाजी नाळे यांनी दिली.
      दरम्यान, शुक्रवार (दि.१८)पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमुळे फुटबॉलशौकिनांना डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर ग्रामीण फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील माजी खेळाडूंचा प्रदर्शनीय सामनाही होणार असून त्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
      स्पर्धेसंबंधी माहिती देताना संभाजी नाळे म्हणाले की, स्व. डी. सी. नरके यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार चंद्रदीप नरके व गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या या स्पर्धेचे यंदा १०वे वर्ष आहे. १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत स्पर्धेतील सामने कुडित्रे (ता.करवीर) येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर होतील. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील फुटबॉल संघांचा सहभाग आहे.
                              स्पर्धेतील बक्षीसे…..
     स्पर्धेतील विजेत्या संघाला २१ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांक ११ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक ७ हजार व चषक देण्यात येणार आहे. तसेच सामन्यातील बेस्ट प्लेअर त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स व बेस्ट गोलकिपर यांनाही गौरविण्यात येणार आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!