कोल्हापूर • प्रतिनिधी
फिफा वर्ल्ड कपनंतर सर्वाधिक पसंती असलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेला १२ जूनपासून सुरुवात होत आहे. १२ जून ते १२ जुलै दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेतील सामन्यांचा थरार क्रीडाप्रेमींना, खासकरून फुटबॉलप्रेमींना पहायला मिळणार आहे.
स्पर्धेचा सलामीचा सामना इटली आणि तुर्की यांच्यात १२ जून रोजी रोममधील स्टॅडियो ऑलिम्पिको येथे होईल. एकूण २४ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत ५१ सामने होतील. अंतिम सामना १२ जुलै रोजी होईल.
गटवार सहभागी संघ…..
• गट अ- तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड
• गट बी- डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रशिया
• गट सी- नेदरलँड्स, युक्रेन, ऑस्ट्रिया,
उत्तर मॅसेडोनिया
• गट डी- इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलंड,
झेक प्रजासत्ताक
• गट ई- स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोव्हाकिया
• गट एफ- हंगेरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी
स्पर्धेची स्टेडियम – शहरे…..
• वेम्बली स्टेडियम: लंडन, इंग्लंड
• सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम: सेंट पीटर्सबर्ग, रशिया
• बाकू ऑलिम्पिक स्टेडियम: बाकू, अझरबैजान
• फुटबॉल अरेना म्युनिकः म्युनिक, जर्मनी
• रोममधील ऑलिंपिको: रोम, इटली
• राष्ट्रीय अरेना बुखारेस्टः बुखारेस्ट, रोमानिया
• स्टेडियम ला कार्टुजा सेविला: सेव्हिले, स्पेन
• जोहान क्रुझिफ अरेना: ॲमस्टरडॅम, नेदरलँड्स
• पुस्कस अरेना: बुडापेस्ट, हंगेरी
• पारकेन स्टेडियम: कोपेनहेगन, डेन्मार्क
• हॅम्पडेन पार्क: ग्लासगो, स्कॉटलंड
——————- भाग – १ —————-
———————————————–