कोविडने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना ‘तिरुपती’ संस्था देणार मदतीचा हात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या तिरूपती कॉर्पोरशन ॲण्ड जीवन संजीवनी या बंगळुरू येथील संस्थेमार्फत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही संस्था मागील काही वर्षापासून पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक मदत करत असून आता कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना या योजनेचा फायदा घेता येणार असल्याची माहिती विकास बांदल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दीपा गवंडी व अजित सुर्वे उपस्थित होते.
     ते म्हणाले की, तिरूपती कार्पोरेशन ॲण्ड जीवन संजीवनी ही बंगळुरू येथे नोंदणी झालेले स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना आर्थिक आणि शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी जनजागृती करत आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम करत आहे. तसेच संबंधित परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे. याशिवाय संपूर्ण परिवारास तीन लाख रुपयांचा वैद्यकीय विमा मेडिकल क्लेम दिला जाणार आहे. ही मदत तिरुपती कार्पोरेशन ॲण्ड जीवन संजीवनी या संस्थेमार्फत मिळवून देत आहोत. यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे. यामध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णाचे आधारकार्ड तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र, रेशन कार्ड, वारसाचे आधार कार्ड, वारसाच्या बँक पासबुकचे झेरॉक्स आणि छायाचित्र यांचा समावेश आहे.
      कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या परिवाराला १० हजार ते ५० हजार रुपयांची मदत, कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मुलांची एक वर्ष शैक्षणिक मिळवून देण्यात येणार आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संपुर्ण परिवारास तीन लाख रुपये किंमतीचा वैद्यकीय विमा मिळवून देण्यात येणार असल्याचे विकास बांदल यांनी सांगितले. यासाठी १, पॅलेस रोड, आंबेडकर वेदी, संपानगी, रामनगर, बेंगळूरू, कर्नाटक ५६०००१ याठिकाणी किंवा ७६११९६८८८८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!