संजय घोडावत विद्यापीठाचा २ मार्चला तिसरा दीक्षांत समारंभ

Spread the love

• डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे प्रमुख पाहुणे
कोल्हापूर • प्रतिनिधी
       संजय घोडावत विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ मंगळवार दि.२ मार्च रोजी दुपारी २:०० वाजता संजय घोडावत विद्यापीठात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे हे लाभलेले आहेत. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत हे भूषविणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
       प्रमुख पाहुणे डॉ.प्रकाश आमटे यांनी आपलं संपुर्ण आयुष्य आदिवासींची सेवा करण्यात व्यतीत केलं आहे. ’’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’’ प्राप्त बाबा आमटेंचे हे द्वितीय चिरंजीव आहेत. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे स्वतः डॉक्टर आहेत. ते दोघेही बाबा आमटेंच्या परंपरेला जोपासत आणि पुढे नेत आदिवासींच्या सेवार्थ आपले पुर्ण लक्ष केंद्रीत करून आहेत. आदिवासी व कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळा सुद्धा स्थापन केली. तसेच लोक बिरादरी प्रकल्प ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवीत आहेत. प्राण्यांचे अनाथालय स्थापन करून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना प्रतिष्ठित असा आशियाचे नोबेल रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
      या दीक्षांत समारंभात विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य केलेले शास्त्रज्ञ, उद्योगपती, प्राध्यापक यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये डीआरडीओचे सुप्रसिद्ध वैज्ञानिका डॉ.टेसी थॉमस यांना विद्यापीठाकडून ”डॉक्टर ऑफ सायन्स” ही मानद पदवी प्रदान केली जाणार आहे. डॉ.थॉमस या भारताची अग्निपुत्री व क्षेपणास्त्र महिला म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांनी भारताच्या संरक्षण खात्यासाठी आपले योगदान दिले असून अग्नी क्षेपणास्त्राच्या सरंचनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
     याचबरोबर जेसन्स लॅब चे सीईओ संजीव शिंदे, शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.गिरीश, आयआयटीएम चे शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार, स्विनबर्न युनिव्हर्सिटी चे शास्त्रज्ञ डॉ.अमरीश कुलकर्णी यांना ”ऑनररी प्रोफेसर” ही मानद पदवी प्रदान केली जाणार आहे.
      या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, परीक्षा नियंत्रक प्रा.प्रीतम निकम व टीमने अथक परिश्रम घेतले आहेत.
      या कार्यक्रमास अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व सचिव श्रेणिक घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!