बाजारभोगाव ते पडसाळी रस्त्याकरीता साडेतीन कोटी रु. मंजूर: खा.मंडलिक


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव – काऊरवाडी – किसरुळ – काळजवडे – पोंबरे – कोलिक – पडसाळी दरम्यानच्या रस्त्याकरीता केंद्रीय रस्ता आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत ३ कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. 
      यासंदर्भात खासदार मंडलिक म्हणाले, दुर्गम व डोंगराळ भागामध्ये विकास व्हावयाचा झाल्यास सुरवातील या भागातील दळणवळण सुधारले पाहिजे. बाजारभोगाव ते पडसाळी दरम्यानचा रस्ता हा वाहतुकीच्यादृष्टीने महत्वाचा रस्ता असून या भागातील वाड्या-वस्त्यांमधून शहराच्या ठिकाणी यावयाचे झाल्यास याच रस्त्याचा वापर केला जात आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ३.७५ मीटर इतकी असल्याने दोन बाजुने मोठी वाहने सहजासहजी ये-जा करता येत नसल्याने या रस्त्याची रुंदी वाढवावी, अशी मागणी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केंद्र शासनाकडे केली असता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या दहा किमी रस्त्याच्या रुंदीकरणाकरीता ३ कोटी ४१ लाख रु. मंजूर करत असल्याची माहिती पत्राव्दारे दिली.
      या रस्त्यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, या रस्त्याची रुंदी ५.५० मीटर इतकी धरण्यात आलेली असून या कामाची निविदा प्रक्रिया राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे व लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरु होणार आहे. हा रस्ता पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र.१९३ कोल्हापूर ते अणुस्कुरा या रस्त्याला मिळणार असल्याने या भागातील शेतमाल लवकरात लवकर पोहचविणे शक्य होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *