जाधव परिवारातील तीन पिढ्यांना मिळाला न्याय: अभिजीत जाधव

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आर्थिक लाभ मिळविण्यासाठी खोट्या तकारी नोंदवून नाहकपणे अनेकांना त्रास देणाऱ्या चंद्रकांत रामचंद्र देशमुख व त्यांची पत्नी वंदना चंद्रकांत देशमुख यांना न्यायालयीन प्रक्रियेतून चाप लागला, असून माझे आजोबा नारायणराव गणपतराव जाधव आणि त्यांच्या तिन्ही पिढ्यातील सर्वांना न्याय मिळाला आहे, अशी माहिती जाधव यांचे नातू अभिजीत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ॲड. विनय भाऊसाहेब कदम यांचे सहाय्यक ॲड. रणजित रविंद्र घोरपडे उपस्थित होते.
      जाधव परिवारास मानसिक त्रास देवून त्यांची सामाजिक प्रतिमाही मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख पती-पत्नी विरोधात जाधव परिवारांच्याकडून सलग नऊ वर्षे ॲड. विनय भाऊसाहेब कदम यांनी न्यायालयात भक्कमपणे मांडलेली बाजू ग्राह्य मानून हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे, असे सांगून अभिजीत जाधव पुढे म्हणाले की, नारायणराव गणपतराव जाधव हे प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व आहे. परंतु देशमुख पती-पत्नी यांनी जाणूनबुजून नारायणराव गणपतराव जाधव यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा आणि त्यांना फसविण्याचा  प्रयत्न करुनदेखिल अपयश आलेले आहे.
      चंद्रकांत रामचंद्र देशमुख व सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांनी शैक्षणिक कामकाजाकरीता व प्रस्तावित नविन सिनिअर कॉलेजच्या मान्यतेच्या कामासाठी नारायणराव गणपतराव जाधव यांच्याकडून रक्कम रुपये २९ , ००,०००/ – (रुपये एकोणतीस लाख फक्त ) तसेच अभिजीत तुलसीदास जाधव यांच्याकडून रक्कम रुपये १०,००,०००/ – (रुपये दहा लाख फक्त ) इतक्या रक्कमा स्विकारल्या होत्या. या रक्कमा स्विकारतेवेळी देशमुख पती-पत्नी यांनी श्री स्वामी विवेकानंद आदर्श विकास शिक्षण संस्था, चंद्रकांत रामचंद्र देशमुख, सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांनी त्यांचे खाते असलेले बॅकेतील खातेवरील धनादेश दिले होते. सदरचे धनादेश नारायणराव गणपतराव जाधव व अभिजीत तुलसीदास जाधव यांना देतेवेळी सदरचे धनादेश वटून त्यापोटी देय असलेल्या रक्कमा नारायणराव गणपतराव जाधव व अभिजीत तुलसीदास जाधव यांना मिळेल अशी हमी व ग्वाही दिली होती. सदरचे धनादेश न वटल्याने नारायणराव गणपतराव जाधव व अभिजीत तुलसीदास जाधव यांनी चंद्रकांत रामचंद्र देशमुख, सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांचे विरुध्द मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीसो, कोल्हापूर यांचे न्यायालयात धनादेश न वटल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती. सदरची फिर्याद गुणदोषावर चालुन मे. न्यायालयाने दिनांक २४/०२/२०१५ रोजी निकाली करीत चंद्रकांत रामचंद्र देशमुख, सौ.वंदना चंद्रकांत देशमुख यांना दोषी मानून प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास आणि रक्कम रुपये ५१,००,००० / – (रुपये एकावन्न लाख फक्त) नुकसान भरपाई म्हणून नारायणराव गणपतराव जाधव आणि अभिजीत तुलसीदास जाधव यांना देण्या संदर्भात आदेश पारित केले. सदर निकालावर नाराज होवून चंद्रकांत रामचंद्र देशमुख आणि सौ.वंदना चंद्रकांत देशमुख यांनी सन २०१६ मध्ये मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांचेकडे अपील दाखल केले होते. सन २०१९ मध्ये चंद्रकांत रामचंद्र देशमुख यांनी मा. दुय्यम निबंधकसो, सहकारी संस्था कोल्हापूर तसेच मा. पोलीस अधिक्षकसो कोल्हापूर यांचेकडे नारायणराव गणपतराव जाधव, त्यांचा मुलगा तुलसीदास नारायणराव जाधव आणि अभिजीत तुलसीदास जाधव यांच्या विरुध्द खाजगी सावकारकीची लेखी तकार अर्ज सादर केले. सदर तकार अर्जाच्या अनुषंगाने मा. दुय्यम निबंधकसो, सहकारी संस्था कोल्हापूर यांचेकडून तपास होवछन सदर तपासाअंती नारायणराव गणपतराव जाधव, त्यांचा मुलगा तुलसीदास नारायणराव जाधव आणि अभिजीत तुलसीदास जाधव यांनी कोणताही खाजगी सावकारकीचा गुन्हा केले नसल्याची बाब सिध्द झाल्याने, मा. दुय्यम निबंधकसो, सहकारी संस्था कोल्हापूर यांनी नारायणराव गणपतराव जाधव, त्यांचा मुलगा तुलसीदास नारायणराव जाधव आणि अभिजीत तुलसीदास जाधव यांचे बाजुने सदरचा अर्ज निकाली केला आहे. त्या अनुषंगाने चंद्रकांत रामचंद्र देशमुख व सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांनी त्यांचे विधिज्ञांमार्फत मा. दुय्यम निबंधकसो , सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने मे. न्यायालयाकडे जादा पुरावा सादर केला होता. परंतु मे. न्यायालयाने चंद्रकांत रामचंद्र देशमुख व सौ. वंदना चंद्रकांत देशमुख यांचे विधिज्ञांचा जादाचा पुरावा ग्राहय न मानता, सदरची अपीले गुणदोषावर निकाली करीत सदरची अपीले नामंजूर करुन खालील कोर्टाचा आदेश कायम करीत केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!