घोडावत पॉलीटेक्निकच्या तीन विद्यार्थ्यांची इन्फोसिस कंपनीमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या तीन विद्यार्थ्यांची इन्फोसिस या प्रख्यात कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग विभागातून यश कलवाडीया, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून प्रशांत कटके आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातून आशुतोष पाटील यांचा समावेश आहे.
     नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच. आर. मुलाखत या निकषांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक २.१२ लाखाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.
     इन्फोसिस ही एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत.आय टी क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.
     विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      तसेच अकॅडमिक डीन प्रा. नितीन पाटील, विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण व प्रा.आर. पी. धोंगडी यांनी त्यांचे कौतुक केले. या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. आरिफ अत्तार व टीम यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!