गोकुळच्या निवडणुकीतून महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करावे: पालकमंत्री


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पन्हाळा तालुक्यातून ठरावधारकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पॅनल टू पॅनल मतदान करून गोकुळच्या निवडणुकीत विजयी करून महाडिक प्रवृत्तीला या निवडणुकीतून हद्दपार करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते पन्हाळा तालुक्याच्या प्रचार सभेत बोलत होते.
      गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी २ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची पन्हाळा तालुका प्रचारसभा पालकमंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली.
      प्रचारसभेत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे. सहकारातील संस्था टिकल्या पाहिजेत. यासाठी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत. दूध उत्पादकांच्या मालकीचा संघ झाला पाहिजे यासाठी आम्ही लढा उभारला. मल्टिस्टेट थांबले नसत तर आज पॅनल उभे नसते. गोकुळमध्ये दोन रुपये चढ शेतकऱ्याला मिळावे हा उद्देश घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलोय. निवडणूक लागली आहे तर विरोधकांनी कोर्टात न जाता ही निवडणूक लढावी. हा संघ माझ्या एकट्याचा राहिला पाहिजे असे षडयंत्र सत्ताधारी आघाडीकडून केले जात होते. मात्र आम्ही ते हाणून पाडले. त्यामुळेच राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला ठरावधारकांचा पाठिंबा मिळतो आहे. आमदार विनय कोरे हे दिलेला शब्द पाळतात. त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. या निवडणुकीत करवीर तालुका कुठेही कमी पडणार नाही. आपणही या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करून महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करावे. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
      यावेळी आमदार विनय कोरे यांनी जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या भविष्यासाठी काय निर्णय घेणार आहोत याचा विचार करून दूध उत्पादक या परिवर्तनाच्या लढाईला उपस्थित राहिले आहेत. आज ज्या दिशेने हा दूध संघ निघाला आहे याला भविष्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थितीत होतो. जिल्ह्यातील भाजप सत्ताधारी आघाडीबरोबर आहे. मात्र मी लोकभावनेची कदर करून दूध उत्पादकांच्या न्यायासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहे. या गोकुळवर आपला हक्काचा जोतिबाचा गुलाल उधळला पाहिजे. गोकुळ ही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थक्रांती आहे. या अर्थक्रांतील आदर्शवत करण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला खंबीरपणे पाठिंबा देऊन पन्हाळा तालुक्यातून विजयाची गुढी उभी करूया असा निर्धार व्यक्त केला.
      यावेळी माजी आम. चंद्रदीप नरके यांनी ही निवडणूक विविध कारणांनी गाजत आहे. या निवडणुकीत चित्र स्पष्ट आहे. विरोधी आघाडी गेली पाच वर्षे दूध उत्पादकांच्या न्यायासाठी सातत्याने लढत आहे. त्यामुळे विजय निश्चित असून विरोधक जाणीवपूर्वक निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. गोकुळच्या सत्तेचा वापर हा राजकारणासाठी होत आहे. शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी आम्ही लढतोय. या दूध संघात सत्तेचे राजकारण होत आहे. संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मालकीचा राहावा यासाठी लढलो, यामध्ये आम्हाला यश मिळाले असल्याचे चंद्रदीप नरके यांनी सांगितले. गोकुळमध्ये आता उत्पादकांना परिवर्तन पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला प्रतिसाद मिळत असून आपल्या पॅनेलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला.
     यावेळी विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पन्हाळा तालुक्यातून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला मताधिक्य द्यावे. पन्हाळा आणि करवीर तालुक्यातून मताधिक्य मिळाल्यावर पॅनेलचा विजय निश्चित असल्याचे सांगुन् कोणीही क्रॉस वोटिंग करू नये असे आवाहन केले.
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *