कोरोना काळात ऑक्सिजन निर्मितीचा गडहिंग्लज पॅटर्न

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापुरातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयमधील ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
      कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागल्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आता कोल्हापुरातील गडहिंग्लज पॅटर्न राबविण्याचा राज्य सरकारचा विचार करत आहे.
     गेल्या वर्षी कोल्हापुरातील गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यन्वित करण्यात आले. सोबतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी ८० लाख रुपये खर्चून चेन्नईतील ऑक्सएअर कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवले जाते.
      या प्रकल्पातून अत्यंत कमी खर्चामध्ये दिवसाला १२० ते १५० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जात असून १५० ऑक्सिजन बेड्सची ऑक्सिजन पूर्तता यातून केली जाते. या प्रकल्पामुळे वीजबिलाशिवाय इतर कुठलाही खर्च ऑक्सिजन निर्मितीसाठी येत नाही.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!