सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त या दोन्ही नेत्यांना शिवाजी विद्यापीठात आज आदरांजली वाहण्यात आली.
     कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांनी एकता व सद्भावना यांची शपथ घेतली. 
      यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. पी.जे. पाटील, डॉ. प्रमोद कसबे यांच्यासह नॅनो सायन्स व तंत्रज्ञान स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!