टोल प्लाझावरुन तीन-चार दिवस टोल आकारु नये: खा. संजय मंडलिक

Spread the love

• खा.मंडलिक यांच्या पूरग्रस्त भागात भेटी
 कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सध्या पाऊस उघडला असल्याने राष्ट्रीय राज्यमार्ग सुरु झाल्यानंतर या वाहनांकडून टोल प्लाझावर तीन ते चार दिवस टोल आकारू नये अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
      खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या मागणीमध्ये कोल्हापूर जिल्हयात महापूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून शहराच्या दोन्ही बाजूस राष्ट्रीय राज्य महामार्गावर वाहनांच्या दोन-तीन दिवसांपासून लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. यामध्ये नाशवंत माल, औषधे, धान्य, भाजी-पाला आदि अत्यावश्यक सेवेतील माल असून या मालाची कोल्हापूर जिल्ह्यास तातडीने आवश्यकता आहे. पावसाचे पाणी ओसरल्यावर राष्ट्रीय राज्य महामार्गावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर या वाहनांच्याकडून टोल वसूल केल्यास ट्रॅफीक जॅम होवून गोंधळ उडण्याची भिती आहे. याकरीता कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधीत महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून तीन ते चार दिवस टोल आकारु असे म्हटले आहे.
                     पूरग्रस्त भागात भेटी…..
       दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेवून संसदेचे अधिवेशन निम्यात सोडून खासदार संजय  मंडलिक काल कोल्हापूरात दाखल झाले.  आज त्यांनी पूरग्रस्त भागात भेटी देवून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची व जेवणासंदर्भात विचारपूस केली. यावेळी सदाशिवराव मंडलिक फौंडेशन व अयोध्या फौंडेशन यांच्या सामाजीक बांधिलकीतून सुरु असलेल्या सेंट्रल किचनमधून दररोज सुमारे साडेपाचशे पुरग्रस्तांना जेवण देत असल्याची माहितीही खासदार मंडलिक यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!