नगररचना विभागाकडून १५५ बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्रे मंजूर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्र शासनाने दि.२ डिसेंबर २०२० रोजी एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावली लागू केलेली आहे. शासनाचे नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार नगररचना विभागाकडे विकास परवाना देणे बाबतचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सदर प्रस्तावांचे विहीत कालावधीत निर्गत होणे कामी नगररचना विभागाकडे दि.१५ मार्च २०२१ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये दि.१७ मार्च २०२१अखेर एकूण १०९ बांधकाम परवानगी प्रकरणे व ४६ भोगवटे प्रमाणपत्र परवाने नगररचना विभागाकडून देण्यात आले आहेत.
      या विशेष मोहिमेमध्ये बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे एकूण १५५ प्रकरणे निर्गत करण्यात आलेले आहेत. सदरची मोहिम प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता यांनी पार पाडली. सदरची मोहिम विकास परवानगी प्रस्ताव संपेपर्यंत चालू राहणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!