जनावरांच्‍या आयुर्वेदिक औषधोपचाराचे गोकुळमार्फत स्‍वयंसेवकांना प्रशिक्षण

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या आनंदराव पाटील – चुयेकर प्रशिक्षण केंद्रामार्फत दूध संस्था सदस्‍य, सचिव व दूध उत्‍पादक शेतकरी, महिलांना प्रशिक्षण दिले जाते. यावेळी पशुसंवर्धन विभागमार्फत आर. बी. पी. स्‍वयंसेवकांना जनावरांमधील आयुर्वेदिक औषधोपचार या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आज ताराबाई पार्क येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये गोकुळचे चेअरमन विश्‍वास नारायण पाटील यांचे हस्‍ते करण्‍यात आले.
     आर.बी.पी. स्‍वयंसेवकांना देण्‍यात येणारे प्रशिक्षण दोन दिवस चालणार आहे. यामध्‍ये जनावरांच्‍या आजारामधील आयुर्वेदिक उपचार पध्‍दतीचे महत्‍व व त्‍याची उपयोगिता, हर्बल गार्डन व्‍हीजीट व आयुर्वेदिक औषधोपचारामध्‍ये उपयोगी येणाऱ्या वनस्‍पती व पदार्थाची ओळख व त्‍यांचे गुणधर्म, प्राथमिक आयुर्वेदिक औषधोपचारामध्‍ये केंद्रामध्‍ये स्‍वयंसेवकांनी जबाबदारी व कार्यपध्दती, जनावरांचे आजार व त्‍यासाठी वापरण्‍यात येणारी उपचार पध्‍दती अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.
     या प्रशिक्षण शिबिरामध्‍ये जिल्‍ह्यातील आर.बी. पी. स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. गोकुळ दूध संघामार्फत दूध व्‍यवसाय वाढीसाठी विविध योजना राबवून दूध उत्पादन किफायतशीर होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन केले जाते. असे प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असे विश्वास पाटील यांनी संगितले.
     प्रास्‍ताविक पशुसंवर्धन विभागाचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु. व्‍ही मोगले यांनी केले. आभार डॉ. विजय मगरे यांनी मानले.
     यावेळी सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. पी. जे. सोळुंके, डॉ. दळवी, डॉ. कामत, डॉ. गोऱ्हे व संघाचे अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!