कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे ५१ वे सभापती म्हणून चंद्रकांत पांडुरंग सुर्यवंशी यांची आज बिनविरोध निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिठासिन अधिकारी म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे होते.
परिवहन समितीच्या सभापती सौ.प्रतिज्ञा उत्तुरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. परिवहन समिती सभापती पदासाठी निर्धारित मुदतीत चंद्रकांत सुर्यवंशी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्रे दाखल झाले होते. त्यामुळे पिठासिन अधिकारी अमन मित्तल यांनी चंद्रकांत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. श्री.सुर्यवंशी यांच्या निवडीनंतर पिठासिन अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यानंतर महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह मान्यवरांनी श्री.सुर्यवंशी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या निवडीवेळी उप आयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त तथा अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, नगरसचिव सुनिल बिद्रे, परिवहन सदस्य अशोक जाधव, सतिश लोळगे, यशवंत शिंदे, प्रसाद उगवे, संदीप सरनाईक, तसेच केएमटीचे अधिकारी उपस्थित होते.