निसर्गमित्र संस्थेतर्फे महाराष्ट्र वृक्ष दिनापासून वृक्ष दत्तक उपक्रम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      निसर्गमित्र संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षानिमित्त  वटपौर्णिमा हा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा वटपौर्णिमा गुरुवारी (दि२४) आहे. यादिवशी संस्थेमार्फत विविध वनौषधी वृक्ष दत्तक योजनेस प्रारंभ करण्यात येणार  असल्याचे संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी सांगितले.
      ते म्हणाले की, पावसाळा सुरू झाला की सर्वांना झाडे लावायला आवडते. सध्या जागतिक तापमान वाढ व विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्या सोडवायचे असेल तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन  केल्याशिवाय पर्याय नाही, पण वृक्षारोपण करताना किमान तीन ते पाच फुटांचा वृक्ष असणे गरजेचे असते. म्हणूनच निसर्गमित्र संस्थेमार्फत सन २००७ पासून वृक्ष दत्तक योजना राबवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून यंदासुद्धा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे वनौषधी वृक्ष दत्तक योजनेस प्रारंभ करण्याचे हाती घेतले आहे.
       यामध्ये वड, आवळा, बेहडा, कडुलिंब, अश्वगंधा, दालचिनी, तमालपत्रे, हादगा, गोकर्ण, गुळवेल, कोहळा, मायाळू, चिबूड, वेखंड, सब्जा, मिंट, बेल, शेंद्री, बहावा, जांभूळ, फॅशन फ्रुट, कवठ, शेवगा, टेंभुर्णी, मोह, शमी, पेरू, कोकम, फणस, लिंबू, रताळे, अंजीर, अडुळसा  कडीपत्ता इत्यादी वृक्ष, वेली, झुडपे आणि फळझाडे ही लोकसहभागातून २००० रोपांची निर्मिती केली आहे. तसेच काही वनस्पतींच्या बिया यांचेदेखील वाटप करण्यात येणार आहे.
      सदर रोपे देणगी ठेव शुल्कामध्ये   अनिल चौगुले, २८२३ / ४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, हॉकी स्टेडियम रोड कोल्हापूर या ठिकाणी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत उपलब्ध होतील.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!