कोल्हापूर • प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे (दि.५ जून) औचित्य साधून निसर्गदूत फौंडेशनच्यावतीने जरगनगर कमानीसमोर भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या जंगली वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
जरगनगर परिसरातील अमीर मुल्ला, दत्तात्रय कुलकर्णी, वसंतराव ठोंबरे, बाबुराव साळोखे, श्री. हलके, अनिल प्रभावळीकर, अशोक पाटील, श्री. आळवणे, रामचंद्र कांबळे, नामदेव पाडळकर, महादेव साळोखे, अशोक हेटवळ, भानुदास पिसे या नागरिकांच्या हस्ते जांभूळ, आंबा, गुलमोहर, कदंब, वड, पिंपळ, सीता-अशोक, पॅथोडीया आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे व सदस्यांनी आज श्रमदान करून ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी केली. यामध्ये योगेश चिकोडे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर, श्रीधर साळोखे, सुमित पाटील, सागर पाटील, शंतनू मोहिते, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कर, विजय पाटील आदींसह भागातील नागरिक सहभागी होते.
———————————————–