कोल्हापूर • प्रतिनिधी
लक्षतीर्थ वसाहत येथील दिव्यांग कॅलेंडर विक्रेता किरण शेटके यास भाजपाच्यावतीने तीनचाकी सायकल भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.
आपल्या उदरनिर्वाहासाठी किरण शेटके हा शहरात अंबाबाई मंदिर परिसरात फिरून कॅलेंडर विकून आपले कुटुंब कसेबसे चालवतो. काही दिवसांपूर्वी अशीच सायकल दिव्यांग व्यक्तीस देण्यात आली होती. त्यानंतर किरण शेटके यांनी भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्षांकडे सायकल मिळणेची मागणी केली होती. त्याच्या अर्जाची दखल घेत, भाजपाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने किरण शेटके या दिव्यांग व्यक्तीस आज लक्षतीर्थ संयुक्त तरुण मंडळ चौक येथे तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली. भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडलाचे पदाधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भाजपा उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष भरत काळे, सरचिटणीस अशोक देसाई ,लक्षतीर्थ येथील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस इकबाल हकीम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आदीनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, दिग्विजय कालेकर, नजीर देसाई, प्रसाद मोहिते, सुमित पारखे, प्रतीराज निकम, महमद शेख, शिवानी पाटील, संजय पाटील, प्रदीप माने, सतीश जाधव, बाळू चौगुले, समीर अत्तार, योगेश तेली, पैमिदा मुल्ला, तबस्सुम हकीम आदिंसह उत्तरेश्वर पेठ मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.