मतदार यादीतील आपले नांव तपासण्यासाठी True Voter ॲप

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मतदार यादीतील आपले नांव तपासण्यासाठी व आपले मतदान कोणत्या प्रभागामध्ये आहे हे पाहण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे True Voter हे ॲप वापरावे. त्यामुळे मतदारांना एका क्षणात आपले मतदार यादीतील नांव सापडेल.
      प्रथम Play store वरून True Voter App डाऊनलोड करावे. https://play.google.com/store/apps/details?id=sec.maharashtra.truevoter.activity हे ॲप उघडलेनंतर मतदारयादीत नावाचा शोध घेण्यासाठी Voter List Search या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर General Search ही स्क्रीन उघडेल. हि लिंक उघडलेनंतर मतदार यादीत नावाचा शोध घेण्यासाठी  Search by Name Wise व Search by ID Card Wise या पैकी एक पर्याय निवडावा. Search by Name Wise या पर्यायाचा वापर करावयाचा असल्यास सुरुवातीला Select District या रकान्यातून ‘कोल्हापूर’ जिल्हा निवडा,  Select Assembly  या रकान्यातून आपला विधानसभा मतदारसंघ निवडावे, आपले नाव व आडनाव टाकून Search बटनवर क्लिक करा, आपण दिलेल्या माहितीआधारे आपल्या नावानुसार यादीची लिस्ट दिसेल. सदर यादीतील आपले नावावर क्लिक करा, मतदारयादीत नाव नोंदणी असल्यास आपले नाव, वय, विधानसभा मतदार संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रभाग क्र. व इतर माहिती दिसेल.
       Search by ID Card Wise या पर्यायाचा वापर करावयाचा असल्यास सुरुवातीला Select District या रकान्यातून ‘कोल्हापूर’ जिल्हा निवडावा,  Select Assembly या रकान्यातून आपला विधानसभा मतदारसंघ निवडावा, Enter ID Card Number या रकान्यात आपले मतदार क्रमांक टाकून Search बटनवर क्लिक करावे, आपण दिलेल्या माहितीआधारे आपले नाव दिसेल. त्यावर क्लिक करावे, मतदारयादीत नाव नोंदणी असल्यास आपले नाव, वय, विधानसभा मतदार संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रभाग क्र. व इतर माहिती दिसेल. मतदार यादीतील नावाबाबत काही हरकत असेल तर विभागीय कार्यालयात लेखी स्वरूपामध्ये कळवावे. तरी या ॲपचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा व आपले मतदान कोणत्या प्रभागांमध्ये आहे हे तपासावे असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!