राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

Spread the love

• राधानगरी धरणातून ४२५६ क्युसेक विसर्ग
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. दुपारी ३:५५ वाजता ६ नंबरचा तर ३:५८ ला ३ नंबरचा दरवाजा खुला झाला आहे. धरणातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
     राधानगरी धरणात २२५.३१ दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी चार वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून १४०० व सिंचन विमोचकातून २८५६ असा एकूण ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
                     ८६ बंधारे पाण्याखाली……
     कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महापूर आला. दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने आता पाणी ओसरू लागले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे काही मार्गावरील पाणी पातळी कमी होत असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी अद्याप ८६ बंधारे पाण्याखाली आहेत.
     पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, व बाचणी. कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे, वेतवडे, आसळज व मांडूकली. धामणी नदीवरील- पनोरे, गवसी, म्हासुर्ली, सुळे व आंबर्डे. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदीवरील- सिद्धनेर्ली, सुळकुड बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरंबे व कसबा वाळवे. वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली व शेणगाव. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, चांदेवाडी, जरळी व हरळी. घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, बिजूर भोगाली, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव, चिकोत्रा नदीवरील- बेळुंकी असे एकूण ८६ बंधारे पाण्याखाली आहेत.
                      धरणातील पाणीसाठा….. 
      जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २२५.३१ दलघमी, तुळशी ९१.९४ दलघमी, वारणा ८८५.०८ दलघमी, दूधगंगा ५७२.०५ दलघमी, कासारी ६२.६१ दलघमी, कडवी ७१.२४ दलघमी, कुंभी ६६.४९ दलघमी, पाटगाव ९३.४२ दलघमी, चिकोत्रा ४०.०९ दलघमी, चित्री ५३.४१ दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी ३०.४३ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, आंबेआहोळ ३०.९८, कोदे (ल.पा) पूर्ण क्षमतेने भरला आहे.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!