महालक्ष्मी चेंबर्समधील दोन दुकाने सील


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महालक्ष्मी चेंबर्समधील समीर कम्युनिकेशन व योगेश टेलिकॉम ही दोन दुकाने सकाळी ११नंतर सुरु ठेवल्याने त्यांच्यावर आज परवाना विभागाच्यावतीने सीलबंद कारवाई करण्यात आली.
     शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. शहरामध्ये या शासन निर्देशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथके स्थापन केलेली आहेत. या पथकामार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी फिरती करुन दुकाने बंद असल्याचे तपासले जात आहे. या पथकामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे पथक अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सुरु असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. पहिल्यांदा सुचना देऊनही पुन्हा दुकान उघडे असल्याचे आढळल्यास सदरचे दुकान सीलबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
      यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *