Unforgettable burmans कार्यक्रम रविवारी   

Spread the love

   
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सचिन देव बर्मन आणि त्यांचे पुत्र राहुल देव बर्मन यांच्या गाण्यांची भुरळ आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हाच धागा पकडून पूर्णा इव्हेंटस् आणि आनंद इव्हेंटस् यांनी करवीरवासियांसाठी Unforgettable burmans नावाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती पूर्णा इव्हेंटच्या प्रमुख मंगल नियोगी यांनी दिली.
      मंगल नियोगी यांनी सांगितले की, बर्मन पिता-पुत्रांच्या गाण्यावर आधारित  या कार्यक्रमात व्हॉईस ऑफ रफी हमीद खान, गायिका गंगा, शिफा आफताब तसेच गायक जोसुला शेखर हे नावाजलेले गायक गीतांची मैफिल सजवणार आहेत. कोल्हापूरातील नामवंत कलाकारांचा वाद्यवृंद आहे. यामध्ये सिंथेसायझर विक्रम पाटील, सचिन जगताप बासरी, केदार गुळवणी व्हायोलिन, धीरज वाकरेकर ढोलक, प्रशांत देसाई तबला, संजय साळोखे आक्टोपॅड, गिटार गणेश साळोखे आणि निवेदन शेफाली मेहता तर साऊंड संदीप चव्हाण असा वाद्यवृंद साथसंगत करीत आहेत.
      कोरोनामुळे ठप्प झालेले जीवनमान गतिमान करण्यात ही सदाबहार गाण्याची मैफिल मोलाची भूमिका निभावणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे.
      यावेळी गायक जोसुला शेखर, गायिका शिफा आफताब यांच्यासह संयोजक गीता हासूरकर, सरदार पाटील आदी उपस्थित होते.
——————————————————-  Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!