पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती संदर्भात भरीव पॅकेजसाठी महायुतीचे खासदार भेटले केंद्रीय अर्थमंत्र्यांना

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापूरामुळे आणि भूस्खलनाने कोल्हापूर, सांगली व सातारा भागावर गंभीर परिणाम झाला असल्याने शेती, निवासी मालमत्ता, पशुधन, लहान मोठे उद्योग, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रभावीत भागात सामान्य स्थिती पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी, बँकिंग क्षेत्र सक्रियपणे प्रभावित करुन या कुटुंबांना, लहान मोठ्या उद्योजकांना आवश्यक ते सहाय्य प्रदान करावे याकरीता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या  खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
     या शिष्टमंडळात खासदार संजय मंडलिक यांच्यासह खा. विनायक राऊत, खा. सुप्रियाताई सुळे, खा. प्रतापराव जाधव, खा. सदाशिवराव लोखंडे आदी उपस्थित होते.
      या संदर्भात अधिक माहिती देताना खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याने लॅाकडाऊनमुळे येथील व्यापार उद्योग सर्व काही गेल्या दिडवर्षापासून ठप्प असल्याने व्यापारी अडचणीतून दिवस काढत होते.  यात भर म्हणून झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा हा शेतीप्रधान असून याठिकाणी नदीकाठी ऊस, भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पावसामुळे शेतामध्ये पाणी थांबून राहिल्याने येथील पिके कुजली आहेत. येथे येणारा पर्यटक, अंबाबाई दर्शनाकरीता येणारा भक्तगण हे न आल्याने यावर अवलंबून असलेल्या सर्वांचे नुकसान झालेले आहे. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, औद्योगिक, उद्योग, पर्यटन, निवासी मालमत्ता, औद्योगिक मालमत्ता, रस्ते, एमएसईबी आदीचे पुरामुळे झालेले नुकसान पाहता जास्तीत जास्त पॅकेज द्यावे अशी मागणी केल्याचे सांगितले.
       दरम्यान, खासदारांच्या या शिष्टमंडळाव्दारे पुरामुळे अनेक क्षेत्रांच्या संपूर्ण जलमग्नतेमुळे नागरिकांनी पासबुक, चेकबुक, मुदत ठेव प्रमाणपत्र, कर्ज करार, एटीएम कार्ड इत्यादी महत्त्वाची बँक कागदपत्रे गमावली आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कागदपत्रे पुनप्राप्त करण्यासाठी त्यांना बँकांचा सक्रिय पाठिंबा द्यावा, जेणेकरून त्यांना सर्व बँकिंग सेवा मिळू शकतील. महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागात बँकिंग सेवा तत्काळ सुरु होण्यासाठी इतर ठिकाणांहून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, जेणेकरून पूरांमुळे खंडित झालेल्या बँकिंग सेवा त्वरित पूर्ववत होतील. ज्या ग्राहकांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले आहे, नुकसानीच्या स्वरूपामुळे त्यांचे कर्ज देण्यास असमर्थ आहेत, बँकांना पुढील सहा महिन्यांसाठी कर्ज परतफेड करण्यास स्थगिती मिळावी. राष्ट्रीयकृत आणि व्यावसायिक बँकांना या प्रभावित क्षेत्रामधअये जिल्हा प्रशासनांमध्ये विशेष सवलतीचे दर देण्यास प्रोत्साहित केले जावे. पुरभागात महसूल अधिकाऱ्यांना पंचनाम्यांद्वारे नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण सुरु आहे सर्व विमा कंपन्यांनी जम्मू – काश्मीर आणि केरळमध्येच्या पुरधर्तीवर महसूल अधिकाऱ्यांद्वारे पंचनामा आधारित विमा रकमेचा परतावा विमा कंपन्यांकडून त्यांचे दावे त्वरित निकाली काढणेसंदर्भात त्यांचे मुख्यालय आणि IRDA द्वारे योग्य सूचना / मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी, शकल्याचे शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
——————————————————-
 Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!