स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गणेश तरुण मंडळाचा अनोखा उपक्रम

Spread the love

• १०० तरुण मंडळांना भारतमातेची प्रतिमा दिली भेट
कोल्हापूर • प्रतिनिधी
     स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्य कपिलतीर्थ परिसरातील गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील १०० तरुण मंडळांना भारतमातेची प्रतिमा देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष ओंकार गोसावी आणि अजित ठाणेकर यांनी दिली.
     स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ते प्रजासत्ताक दिन असा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या अनुषंगाने हा उपक्रम हाती घेतल्याचे ओंकार गोसावी यांनी सांगितले.
     २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या दोन राष्ट्रीय सणांचेवेळी सर्व नागरिकांनी ध्वजवंदन करावे असा संकेत आहे. परंतु काही जणांना इच्छा असूनही ते साध्य होत नाही. त्यांनी किमान भारतमाता प्रतिमा पूजन करावे अशी अपेक्षा अजित ठाणेकरांनी व्यक्त केली. ज्या मंडळांना प्रतिमा दिल्या त्यांनी या दोन दिवशी आपापल्या ठिकाणी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांना घेऊन प्रतिमा पूजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
      या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभंकर गोसावी, पार्थ शेट्ये, पुरुषोत्तम ठाणेकर, संग्राम घोरपडे, योगेश जोशी, अर्जुन घोरपडे, बसू अंगडी आदि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!