विधानपरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांची बिनविरोध निवड

Spread the love

कोल्हापूर • (जिमाका)
      महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक २०२१ मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
      यावेळी निवडणूक निरीक्षक तथा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल(भाप्रसे), निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
      महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक २०२१ साठी ५ उमेदवारांची ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननीत ४ उमेदवारांची ६ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. अमल महादेवराव महाडिक (पक्ष- भारतीय जनता पार्टी), शौमिका अमल महाडिक (अपक्ष) व शशिकांत शामराव खोत (अपक्ष) या ३ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
       महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणुकीत सतेज उर्फ बंटी डी. पाटील विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घोषित केले.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!