कोल्हापूर • प्रतिनिधी
कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सीझनच्या लाँच कम्युनिकेशनचे रुपांतर जाहिरात कँपेनवरून ब्रँडेड एंटरटेनमेंटमध्ये करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते नितेश तिवारी संकल्पित, लिखित आणि दिग्दर्शित दीर्घ स्वरुपातील चित्रपट प्रथमच तीन टप्प्यांत सादर केला जाईल.
विशेषत: मध्य प्रदेशातील बेरचा येथे चित्रीत या चित्रपटात स्टेज आणि फिल्ममधील कामगिरीकरिता प्रसिद्ध असलेला ओंकार दास मणिपुरी याने अभिनय केला आहे. कथानकात स्थानिक प्रतिभेची जोड मिळाल्याने चित्रपटात अधिक सिनेमॅटिक अनुभव मिळाला. बेरचासारख्या खऱ्या खेड्यात फिल्म चित्रीत करण्यामागील कल्पना म्हणजे, केबीसी देशातील अगदी दुर्गम भागातील लोकांनाही कसे आपलेसे करतो, हे त्यातून दाखवायचे आहे.
फिल्म एका प्रासंगिक परिदृश्याने सुरु होतो. प्रासंगिक पात्र आणि कथा, विनोदी छटांद्वारे प्रेक्षकांना अनपेक्षित रितीने गुंतवून ठेवतो. गोष्ट कशी उलगडते, हे जाणून घेण्यासाठी पहात रहा!
दरवर्षी, केबीसीने सामान्य संवादाचा एक भाग होण्याच्या आगळ्या वेगळ्या विचारांतून प्रेक्षकांचे प्रेम संपादन केले. या वर्षी कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितेश तिवारी यांनी तीन भागातील ‘सम्मान’ शॉर्ट फिल्मच्या माध्यामातून मानवी भावना आणि महत्त्वाकांक्षा यांना पुन्हा जिवंत केले आहे.