क्रिडाई दालन-२०२२ माहिती पुस्तिकेचे अनावरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       क्रीडाईच्यावतीने दालन – २०२२ या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शनाचे आयोजन ८ ते ११ एप्रिल कालावधीत केले आहे. शाहूपुरी जिमखाना येथे होणाऱ्या या प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजचे जितेंद्र गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रेसिडेन्सी क्लब येथे हा अनावरण सोहळा झाला.
       यावेळी क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी संघटनेच्या ३३ वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. ११व्या दालन प्रदर्शनाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       दालनचे चेअरमन प्रकाश देवलापूरकर यांनी कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना नवीन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान, बांधकामविषयक साहित्य, आधुनिक उपकरणे, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था व बँकांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याचे सांगितले. प्रदर्शनामध्ये १५० हून अधिक स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाल्याचे त्यांनी सांगितले.
       याप्रसंगी क्रीडाईचे उपाध्यक्ष चेतन वसा, खजानिस गौतम परमार, सोमराज देशमुख, दालनचे उपाध्यक्ष अजय डोईजड, संदीप मिरजकर, दालन विविध कमिट्यांचे चेअरमन व सदस्य, क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी व सभासद, प्रायोजक आणि स्टॉलधारक उपस्थित होते. क्रीडाईचे सचिव प्रदीप भारमल यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!