‘नरशार्दूल राजा संभाजी’ फिल्मच्या चित्रफित व पोस्टरचे अनावरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘नरशार्दूल राजा संभाजी’ या फिल्मच्या पहिल्या चित्रफितीचे (ट्रेलर) आणि पोस्टरचे अनावरण खासदार  संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवतीर्थ रायगड येथील राजसदरेवर आज दिमाखात करण्यात आले.
      यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे खरे मावळे तुम्ही आहात आणि ही कलाकृती शिवभक्तीतून घडली आहे. अशा कलाकृतीतून तरुणांना खरा इतिहास पुन्हा डिजिटल रूपाने पाहता व अनुभवता येईल असे सांगितले. या फिल्मसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन हर्षल सुर्वे व कोल्हापूरच्या सर्व कलाकारांचे कौतुक केले.
      यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, हर्षल सुर्वे, अमित अडसूळ, विपुल हळदणकर, शुभम जाधव, गणेश खोचिकर, सूचित पोतदार, देवेंद्र सावंत, चैतन्य अष्टेकर, संकेत खोत, सुजित जाधव, गणेश डांगे, श्रद्धा सुर्वे, अमृता सावेकर, जिजाई सुर्वे, मल्हार सुर्वे आदींसह कार्यकर्ते व कलाकार  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!