उपनगरांचा नियोजनबध्द विकास करण्यास कटीबध्द :खास.मंडलिक


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर शहरातील उपनगरांचा नियोजनबध्द विकास करणेकरीता आपण कटीबध्द असून याची सुरवात रामानंदनगर येथून करत असल्याचे प्रतिपादन खा. संजय मंडलिक यांनी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रामानंदनगर येथील ओपनस्पेस विकसीत या कामाच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी बोलताना केले.  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील हे उपस्थित होते. 
    याप्रसंगी बोलताना खा. मंडलिक म्हणाले,रामानंदनगर येथील ओपन स्पेस विकसीत व्हावा अशी मागणी स्थानिक नागरीकांची होती याकरीता संजय पाटील यांचेसह स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला असून या ओपन स्पेस करीता खासदार निधीमधून बारा लाख तीस हजार रु. मंजूर झाले असून यामध्ये जेष्ठ नागरीकांकरीता वॅाकिंग ट्रेक, ऑक्सिजन पार्क तसेच सभोवती कपौंड वॅाल बसविणे आदी कामे याठिकाणी होणार आहेत.
   आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिणमधील विविध विकासकामांचा आढावा घेतला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी तर वैभव देसाई यांनी आभार व्यक्त केले.  याप्रसंगी ॲड.सुरेश कुराडे, रमेश पुरेकर, नितीन पाटील, शेखर मंडलिक, सतिश भाले, धुलेंद्र पोवार, विश्वजीत कोळी, सुजित देसाई, संजय वाडकर, तुषार पाटील, सचिन कांबळे, विजय गुरव, संतोष जरग, के.ए.परब, हेमंत गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *