शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त लसीकरण शिबीर; युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
     शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.२३) शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोव्हीड १९ च्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर शासनाने  १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींची लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्यावतीने शहरातील ९ ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील मुला – मुलींचे मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात होते. या लसीकरण शिबिरास युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     शहरातील काशिलिंग विश्वेश्वर मंदिर कसबा बावडा येथे ३५, उभा मारुती चौक पोलीस चौकी शिवाजी पेठ येथे ७०, खोलखंडोबा हॉल शनिवार पेठ येथे ३२, महाराणी ताराराणी विद्यालय मंगळवार पेठ येथे ३५, सदर बाजार हौसिंग सोसायटी कोमनपा हॉल येथे ६०, रमाबाई आंबेडकर शाळा उत्तरेश्वर पेठ येथे ८०, जगदाळे हॉल राजारामपुरी येथे ९८, शेलाजी वनाजी शाळा लक्ष्मीपुरी २५, आदर्श विद्यामंदिर बापट कॅम्प येथे २२ अशा एकूण ४५७ मुला – मुलींचे लसीकरण करण्यात आले.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!