बी व सी डिव्हीजन फुटबॉल खेळाडू व पदाधिकारी यांच्यासाठी लसीकरण मोहिम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सन २०१९ मध्ये केएसएकडे बी व सी डिव्हीजन अंतर्गत नोंदणी केलेल्या फुटबॉल संघातील सर्व पदाधिकारी व खेळाडू यांना लसीकरण करण्याचे नियोजन केएसएने केलेले आहे. त्यासंदर्भात सर्व पदाधिकारी व खेळाडू यांची आजअखेर झालेल्या लसीकरणाची माहिती संकलित करण्यात  येणार आहे. त्यासाठी आवश्यक फॉर्म केएसए कार्यालयात देण्यात येणार आहे.
     कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌ असोसिएशनच्या पेट्रन्‌ सौ.मधुरीमाराजे छत्रपती यांनी संघ व खेळाडूंबरोबर झालेल्या ऑनलाईन वेबिनार मिटींगमध्ये फुटबॉल खेळाडुंनी लस घेण्याबाबत आवाहन केले होते. त्याअनुषंगाने २०१९ मध्ये बी व सी डिव्हीजनमध्ये नोंदणी केलेल्या पदाधिकारी व खेळाडूंचे लसीकरण करण्याचे नियोजन केएसएने केले आहे. 
      लसीकरणासंदर्भात बी व सी   डिव्हीजनमधील संघांच्या पदाधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबरपर्यंत केएसए कार्यालयातून फॉर्म घ्यावा. या लसीकरण फॉर्ममध्ये माहिती भरून १६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी  सहा वाजेपर्यंत केएसए कार्यालयात द्यावा, असे आवाहन केएसएच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!